संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामांत स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं...
जितक्या ओढीने ते बाहेर जातात, तितक्याच ओढीने ते घरीही येतात. ते अतिशय गरिबीत वाढले. आपली साधी राहणी त्यांनी कधीच सोडली नाही. निरलस वृत्ती, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, वाचन, चिकाटी, मनाचा सच्चेपणा, खुलेपणा, निर्भीडपणा, मूल्यांना असलेले प्रथम अधिष्ठान अशा गुणसमुच्चयांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उन्नत आणि भव्य बनते.......